आरवडे येथील जवान रावसाहेब चव्हाण यांना वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:38+5:302021-05-03T04:21:38+5:30

रावसाहेब चव्हाण हे २००१ मध्ये सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांनी आतापर्यंत जैसलमैर, झाशी, कारगील, दिल्ली, सिक्कीम, अशा ...

Veermaran to Jawan Raosaheb Chavan from Arwade | आरवडे येथील जवान रावसाहेब चव्हाण यांना वीरमरण

आरवडे येथील जवान रावसाहेब चव्हाण यांना वीरमरण

रावसाहेब चव्हाण हे २००१ मध्ये सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांनी आतापर्यंत जैसलमैर, झाशी, कारगील, दिल्ली, सिक्कीम, अशा भागात सेवा बजावली हाेती. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव मूळगावी आरवडे येथे आणण्यात आले. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी लष्कर, महसूल, पोलीस दल, पंचायत समिती, माजी सैनिक संघटनेच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांच्यासह लष्करातर्फे सुभेदार प्रकाश व्हेकर, सुभेदार एस. मुंडे, हवालदार एकनाथ पाटील व जवान उपस्थित होते. गटविकास अधिकारी दीपा बापट, उपसरपंच पंढरीनाथ वाघ, माजी सैनिक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

फाेटाे : ०२ मांजर्डे १

Web Title: Veermaran to Jawan Raosaheb Chavan from Arwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.