वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दी वर्षास १५ जुलैपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:27+5:302021-07-05T04:17:27+5:30

ओळी : सिंदूर (ता. जत) येथे वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या नियोजन बैठकीत धनाजी गुरव यांनी मार्गदर्शन ...

Veer Sindoor Laxman Smriti centenary year started from 15th July | वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दी वर्षास १५ जुलैपासून सुरुवात

वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दी वर्षास १५ जुलैपासून सुरुवात

ओळी : सिंदूर (ता. जत) येथे वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या नियोजन बैठकीत धनाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. गौतम काटकर, प्रा. दादासाहेब ढेरे उपस्थित हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या हौतात्म्यास १५ जुलै २०२२ राेजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या स्मृती शताब्दी वर्षाला १५ जुलैपासून प्रारंभ होत आहे. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात वीर सिंदूर लक्ष्मण यांचे स्मृती शताब्दी वर्ष विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरे करणार असल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव यांनी केली.

सिंदूर (ता. जत) येथे वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दीच्या पूर्वतयारी संदर्भातील व्यापक बैठक ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. त्यावेळी गुरव बोलत होते. सरपंच गंगाप्पा हारुगेरी अध्यक्षस्थानी होते. धनाजी गुरव म्हणाले, सिंदूरचे 'वीर सिंदूर लक्ष्मण' अत्यंत लढाऊ क्रांतिवीर होते. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने आजवर घेतली नाही. त्यांचा क्रांतिकारी इतिहास सांगितला गेला नाही. स्मृती शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या क्रांतिकार्याची माहिती समाजासमाेर आणू.

प्रा. गौतम काटकर यांनी वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या लढ्याची माहिती दिली. १५ जुलै रोजी सिंदूर येथूनच स्मृती शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. बैठकीत स्मृती शताब्दी वर्षाचे कार्यक्रम व आराखडा याबाबत चर्चा झाली. चर्चेत मारुती शिरतोडे, प्रा. दादासाहेब ढेरे, सुरेंद्र सरनाईक, दगडू जाधव, हिम्मतराव मलमे, बाबुराव जाधव, कवी नितीन चंदनशिवे, आदित्य माळी, भगवान सोनंद, विशाल शिरतोडे, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर, विक्रम शिरतोडे, पाटील व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या घराला विद्रोही सांस्कृतिक चळवळ व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट दिली.

बैठकीचे संयोजन क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मारक समितीचे अध्यक्ष बी. आर. पाटील यांनी केले. प्रा. हणमंत मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महादेव बालीकाई, सुरेश मुडशी, आप्पासाहेब जनगोंड, सुरेश काडगोंड, दयानंद बाबानगर, आव्वाना कांबळे, शिवानंद हारुगेरी, भिमन्ना सुतार, अकबर मुल्ला आदी उपस्थित होते.

040721\1741-img-20210704-wa0044.jpg

*क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात*

महाराष्ट्रात वर्षभर विविध उपक्रम -कॉम्रेड धनाजी गुरव

Web Title: Veer Sindoor Laxman Smriti centenary year started from 15th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.