वासुंबेच्या गलाई बांधवाने जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:55+5:302021-05-31T04:20:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या मोफत कोविड सेंटरला वासुंबे (ता. खानापूर) गावचे ...

वासुंबेच्या गलाई बांधवाने जोपासली सामाजिक बांधिलकी
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या मोफत कोविड सेंटरला वासुंबे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व बिहारच्या पटना स्थित सोने-चांदी व्यावसायिक उद्योजक आनंदराव सुबराव पवार यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वसामान्य रुग्णांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ, जिल्हा परिषद व पंचायत समितीने विटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने सुरू केलेल्या मोफत कोविड रुग्णालयाला उद्योजक व दानशूर व्यक्तिंनी मदतीचा हात दिला आहे. या मोफत कोविड सेंटरला औषधे, रुग्णांना भोजन, रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी मदतीचे अनेक हात पुढे येऊ लागले आहेत. वासुंबे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व बिहारच्या पटना येथील सोने-चांदी व्यावसायिक आनंदरावशेठ पवार यांनी विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोफत कोविड सेंटरला लागणाऱ्या औषधांसाठी ५१ हजार रुपयांची मदत दिली. त्यातील २१ हजार रुपये विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोना रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी व आरोग्य केंद्राच्या कोविड रुग्णालयाला औषधांसाठी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
उद्योजक पवार यांनी ही मदत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, वासुंबेचे माजी उपसरपंच विकास पवार, तानाजी पवार, सुरेश भिंगारदेवे, बामणीचे भरत लेंगरे आदी उपस्थित होते.