वाटेगावात वासुदेव हरी संगीत महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:39+5:302021-03-27T04:26:39+5:30

वाटेगाव येथे श्री वासुदेव हरी संगीत महोत्सवात भक्तिरस सादर करताना ऋतुजा कुलकर्णी. लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : वाटेगाव (ता. ...

Vasudev Hari Music Festival in Vategaon | वाटेगावात वासुदेव हरी संगीत महोत्सव उत्साहात

वाटेगावात वासुदेव हरी संगीत महोत्सव उत्साहात

वाटेगाव येथे श्री वासुदेव हरी संगीत महोत्सवात भक्तिरस सादर करताना ऋतुजा कुलकर्णी.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील श्री वासुदेव मंदिरात श्री वासुदेव मूर्ती प्रतिष्ठापना दिनानिमित्त श्री वासुदेव हरी संगीत महोत्सव संपन्न झाला.

या संगीत महोत्सवाचा प्रारंभ गजानन, सुरेश, प्रकाश धुमाळ त्यांच्या शहनाई वादनाने झाला. तबलावादन मयूर जोशी- शिराळा, शास्त्रीय गायन सोमनाथ लमकाने- इचलकरंजी, यशराज शेवाळे- ईश्वरपूर, सतार वादन उमंग व आर्य तडफाळे- पुणे, अभंगरंग -स्वामी समर्थ कलामंच- शिराळा, बासरीवादन प्रथमेश लाड- ईश्वरपूर, व्हायोलिनवादन धनंजय गाडगीळ- सांगली, भक्तिरस कुमारी ऋतुजा कुलकर्णी- ईश्वरपूर, अभय पोतदार- हातकणंगले, नारदीय कीर्तन ह. भ. प. कु मोहक बुवा रायकर- डोंबिवली या सर्वांनी श्री वासुदेव हरी संगीत महोत्सवांत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला.

या संगीत महोत्सवाचे आयोजन दिनेश, अविनाश, देवदत्त दिवेकर बंधुंनी केले होते. याप्रसंगी मंदिरात विविध धार्मिक विधी करून श्री वासुदेव मूर्ती प्रतिष्ठापना दिन साजरा करण्यात आला.

Web Title: Vasudev Hari Music Festival in Vategaon