शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वसगडे रेल्वे उड्डाणपूल अखेर खुला, स्थानिक नेत्यांत श्रेयवाद रंगला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:14 IST

कृती समितीच्या पाठपुराव्याला यश  

सांगली : सांगली-पलूस मार्गावरील वसगडे येथील रेल्वे उड्डाणपुलावरून वर्षभरापासून राजकारण रंगले होते. हा पूल तयार होऊनही वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नव्हता. कधी उद्घाटनाच्या नावाखाली तर कधी कामे अपूर्ण असल्याचे कारण देत पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येत नव्हता. या पुलासाठी नागरिक जागृती मंच व कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहारही केला. अखेर सोमवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. त्यात पुलाच्या उद्घाटनावरून भाजप व काँग्रेस पक्षात श्रेयवाद रंगल्याचेही दिसून आले.अडीच वर्षापूर्वी वसगडे येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. दीड वर्षात काम पूर्ण होऊन पूल तयार झाला. पण त्याचे लोकार्पण होत नव्हते. ऑगस्ट महिन्यात सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली. कृती समितीची तक्रार सोशल माध्यमातून फिरताच मुख्यमंत्र्यांनीही तातडीने आदेश दिले आणि पूल वाहतुकीसाठी खुला झाला. पण चोवीस तासातच पुन्हा हा पूल रेल्वे प्रशासनाने बंद केला.त्यानंतर नवरात्रीमध्ये या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे करण्यात येणार असल्याचे पत्रच रेल्वे प्रशासनाने कृती समितीला दिले. पण दसऱ्यापर्यंत पुलाचे लोकार्पण झाले नाही. त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त ठरला. पण हा मुहूर्तही हुकला. यावरून कृती समिती व नागरिक जागृती मंचाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा पुल स्थलांतरित करावा, अशी उपरोधिक मागणी केली होती. कडेगाव येथील आमसभेतही पुलाचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा आमदार विश्वजित कदम यांनी लवकरच पुलाचे लोकार्पण होईल, असे आश्वासन दिले होते.अखेर सोमवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी कृती समितीचे सतीश साखळकर, महेश खराडे, शंभोराज काटकर, गजानन साळुंखे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

भाजप-काँग्रेसचे दावे प्रतिदावेदरम्यान, पुलाच्या कामावरून भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवाद उफाळून आला. खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम, महेंद्र लाड, अमोल पाटील यांच्याहस्ते नारळ फोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुलाचे लोकार्पण केले. तत्पूर्वी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी पुलावरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी खुला केला. दोन्ही पक्षाकडून पुलाबाबत दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.

आता अंडरपास, सेवा रस्ता व्हावावसगडे उड्डाणपुल सुरू झाला असला तरी सेवा रस्त्याची दुरवस्था आहे. सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. हा रस्ताही काँक्रीटचा होणार आहे. त्याचे काम तातडीने सुरू व्हावे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांसाठी अंडरपासचे कामही रेल्वे प्रशासनाने तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Vasgade Railway Overpass Finally Opens, Credit War Erupts

Web Summary : The Vasgade railway overpass on the Sangli-Palus road finally opened after a year of political wrangling. Delays due to inauguration disputes and incomplete work frustrated locals. The opening sparked a credit war between BJP and Congress, each claiming responsibility. Locals demand service road and underpass completion.