‘वसंतदादा’स जप्तीची नोटीस -ऊसदराचे ४६ कोटी थकीत
By Admin | Updated: July 26, 2014 00:36 IST2014-07-25T23:40:42+5:302014-07-26T00:36:00+5:30
तहसीलदारांची कारवाई

‘वसंतदादा’स जप्तीची नोटीस -ऊसदराचे ४६ कोटी थकीत
: मिरज : सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याने ऊस दराची ४६ कोटी देय रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्याने मिरजेच्या तहसीलदारांनी आज, शुक्रवारी कारखान्याच्या मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली.
वसंतदादा पाटील साखर कारखान्याने गतवर्षी २०१३-१४ च्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित (एफआरपी) ऊसदराची रक्कम अद्याप दिलेली नाही. याबाबत शेतक ऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर वसंतदादा कारखान्याने एफआरपीप्रमाणे ऊसदराची देय रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे आदेश साखर आयुक्त विजय सिंघल यांनी कारखाना व्यवस्थापनाला दिले होते. मात्र, त्यानंतरही फरकाची ४६ कोटी ३९ लाख ५५ हजारांची रक्कम कारखान्याने दिली नसल्याने साखर आयुक्तांनी ६ जूनला या रकमेच्या वसुलीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांनी वसंतदादा कारखाना व्यवस्थापनास ऊस दराच्या ४६ कोटी ३९ लाख रुपयांच्या वसुलीसाठी जमीन महसूल थकबाकी प्रक्रियेनुसार नोटीस दिली आहे. थकबाकी वसुलीसाठी कारखान्याच्या (पान ९ वर)