शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँक घोटाळ्यास ‘सहकार’चा खो, स्थगितीचा सपाटा, अंतिम टप्प्यात येऊ सुनावणी रेंगाळली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 19:32 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणात कलम ८८ च्या चौकशीला आता सहकार विभागानेच खो घातला आहे. सहकारमंत्र्यांसमोर होत असलेल्या सुनावण्या, एकापाठोपाठ एक स्थगिती आदेश यामुळे प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन रेंगाळली आहे. 

सांगली - अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणात कलम ८८ च्या चौकशीला आता सहकार विभागानेच खो घातला आहे. सहकारमंत्र्यांसमोर होत असलेल्या सुनावण्या, एकापाठोपाठ एक स्थगिती आदेश यामुळे प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन रेंगाळली आहे. अवसायानातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रांवरील सुनावणी सुरू असताना, सर्वांनी म्हणणे सादर केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तरीही वारंवार सहकारमंत्र्यांकडे होणारे अपिल, सहकारमंत्र्यांकडून येणारे स्थगिती आदेश यामुळे या प्रक्रियेला बाधा येत आहे. यापूर्वीही तत्कालिन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन अधिकाºयांना घोटाळ््यातून वगळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही वारंवार सहकारमंत्र्यांकडून असे आदेश येतच राहिले. विद्यमान सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे प्रकाश साठे आणि विजय घेवारे यांनी अपिल केले होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीत आरोपपत्राचा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगितीचे आदेश सहकारमंत्र्यांनी काढले. मदन पाटील यांचे वारसदार असलेल्या जयश्रीताई पाटील, सोनिया होळकर आणि मोनिका पाटील तसेच तत्कालिन तज्ज्ञ संचालक बी. डी. चव्हाण यांनीही सहकारमंत्र्यांकडे अपिल दाखल केले आहे. अंतिम सुनावणीसाठी आता त्यांचेही अपिल सहकारमंत्र्यांपुढे ठेवण्यात आले आहे. याशिवाय आरोपपत्राच्या विरोधात ६ आणि जप्ती आदेशाविरोधात दोन अशा एकूण आठजणांनी पुणे येथील राज्य सहकारी अपिलीय न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे एकूणच ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर रेंगाळली आहे. सहकार विभागाच्या भूमिकेबद्दल आता साशंकता व्यक्त होत आहे. गतीने सुनावणी होण्याची व प्रकरणे निकालात काढण्याची भूमिका यापूर्वी अनेकदा सुभाष देशमुख यांनी मांडली होती. न्यायप्रविष्ट बाबींचा अडथळाही त्यांनी मांडला होता. अशा परिस्थितीत सहकार विभागाकडूनही स्थगितीचे आदेश येऊ लागल्याने एकूणच त्यांच्या भूमिकेतील संभ्रम लोकांसमोर येत आहे. वसंतदादा बँकेच्या घोटाळ््यातील रकमाही चौकशीतील विलंबामुळे यापूर्वी कमी झाल्या आहेत. अनेक प्रकरणे वगळण्यात आली होती. त्यामुळे आता चौकशीला विलंब झाल्यास यातील आणखी काही प्रकरणे वगळण्याची वेळ येऊ शकते.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रbankबँक