शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Sangli News: वसंतदादा बँकेने नियमबाह्य दिलेले तीन कोटींचे कर्ज वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:12 IST

महापालिकेच्या ठेवी परत मिळविण्याबाबतही प्रयत्न

मिरज : वसंतदादा शेतकरी बँकेने  कर्नाटकात नियमबाह्य दिलेल्या तीन कोटी कर्जासह वर्षभरात २० कोटी थकित कर्ज वसूल केले आहे. बॅंकेच्या अवसायकाची मुदत संपल्याने येत्या वर्षभरात  राज्यातील इतर शहरांतील बॅंकेची ३७ कोटींची मालमत्ता विक्री करून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात येणार असल्याचे  बॅंकेच्या अवसायक व महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.अवसायक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरात २० कोटी रुपये वसूल केले आहेत. अवसायकाची १५ वर्षांची मुदत यावर्षी संपल्याने आता आणखी एक वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव आहे.  पुढील वर्षी मार्चमध्ये बॅंकेवर अवसायनी नियुक्त होणार असल्याने  वर्षभरात बँकेच्या  मुंबई, पुणे, ठाणे यासह अन्य शहरांतील एकूण ३७ कोटींची मालमत्ता  विक्री  व तारणी कर्जाच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. बँकेच्या  सांगलीतील मुख्य इमारतीचा लिलाव झाला आहे. बॅंकेचे थकित कर्ज येणे १५६ कोटी रुपये असून यापैकी तारणी कर्ज ३५ कोटी आहे.व्याजासह देणी १५३ कोटी रुपये आहेत. थकित कर्जे वसुलीसाठी सहकार कायद्यान्वये दहा मोठ्या कर्जदारांच्या २० कोटी रुपये वसुलीसाठी जप्ती व लिलावाची  कारवाई करण्यात येत असल्याचेही स्मृती पाटील यांनी सांगितले.  बँकेने कर्नाटकातील अथणी शुगर्ससह पाच जणांना राज्याबाहेर नियमबाह्य दिलेल्या तीन कोटी १५ लाख थकित कर्जाची वसुली करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.ऐपत असूनही कर्ज भरत नाहीत, अशा अनेक कर्जदारांची प्रकरणे वसुलीचा हुकूमनाम्यासाठी सहकार न्यायालयात प्रलंबित असल्याचेही स्मृती पाटील यांनी सांगितले.  यापूर्वी लातूर येथे कार्यरत असताना अनेक बँकांवर प्रशासक व अवसायक म्हणून कामकाज केल्याने या बँकेवर काम करणे सोपे झाले, असे पाटील यांनी सांगितले.महापालिकेच्या ठेवी परत मिळविण्याबाबतही प्रयत्नमहापालिकेच्या ३२ कोटींच्या ठेवी शेतकरी बॅंकेत अडकल्या आहेत. बॅंकेची थकित कर्जे वसूल झाल्यानंतर सहकार आयुक्त महापालिकेच्या ठेवी परत देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही स्मृती पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक