ढालेवाडीच्या उपसरपंचपदी वसंत माेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:04+5:302021-06-09T04:35:04+5:30
ढालगाव : ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत कृष्णा मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) ...

ढालेवाडीच्या उपसरपंचपदी वसंत माेरे
ढालगाव : ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत कृष्णा मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील उपसरपंचांनी कार्यकाळ संपल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते. सरपंच रामदास साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीस नऊपैकी आठ सदस्य उपस्थित होते. यावेळी वसंत मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीस सविता साळुंखे, अमिता आठवले, सुषमा कारंडे, विमल शिंदे, सरस्वती कोष्टी, प्रशांत आठवले, सोमनाथ मलमे हे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक श्रीकांत क्षीरसागर, पोलीस पाटील रवी आठवले, काकासाहेब आठवले, माजी सरपंच नानासाहेब कारंडे, हिंमत साळुंखे, वीरभद्र कोष्टी उपस्थित होते.
उपसरपंच निवडीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, सुहास चव्हाण, पोपट देसाई, आनंदा कुंभार यांनी बंदोबस्त ठेवला होता.