शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

घाटनांद्रे परिसरामध्ये वरुणराजाचा चकवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 15:52 IST

कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथा परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, घाटनांद्रे गावाला मात्र पावसाने चकवा दिला आहे. येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ओढे, नाले, बंधारे तलाव कोरडे ठणठणीत आहेत.

ठळक मुद्देघाटनांद्रे परिसरामध्ये वरुणराजाचा चकवाच ओढे, नाले, बंधारे तलाव कोरडे ठणठणीत

जालिंदर शिंदे घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथा परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, घाटनांद्रे गावाला मात्र पावसाने चकवा दिला आहे. येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ओढे, नाले, बंधारे तलाव कोरडे ठणठणीत आहेत.

शेतीसाठी पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. पाऊस नसल्याने माळावर गवत उगवलेले नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.घाटनांद्रे हे कवठेमहांकाळ तालुक्यातील शेवटचे घाटमाथ्यावरील गाव आहे. या भागात चार वर्षांपासून एकही दमदार पाऊस झालेला नाही. सततच्या दुष्काळाने भूजल पातळी खालावली आहे. या पट्ट्यात नगदी पीक म्हणून द्राक्ष उत्पादनाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे द्राक्षबागांचे क्षेत्र वाढले. तेही पाण्याविना संकटात आले आहे. टॅँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचा दरही अवाच्या सवा आहे. पिण्यासाठीही पाणी चढ्या भावाने विकत घ्यावे लागत आहे.पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाचा पेराही हाती लागण्याची शक्यता धूसर झाली आहे. शेतातील पीक थांबल्याने शेतीवर आधारित इतर व्यवसाय, त्याचबरोबर पशुधन, दुग्ध व्यवसाय हेही संकटात आले आहे. त्यामुळे बळीराजाचे अर्थकारण कोलमडले आहे.

परतीच्या पावसाने घाटमाथ्यावरील इतर गावांना चांगलाच आधार दिला आहे. परंतु घाटनांद्रे परिसराला चकवा दिला आहे. त्यामुळे बळीराजा हतबल व चिंताग्रस्त बनला असून, त्याचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

अशा दुष्काळजन्य परिस्थितीत बळीराजाला एक टॅँकर एक हजार रूपयांना, एक बॅरेल (१०० लिटर) पाचशे रूपयांना विकत घ्यावा लागत आहे. तसेच शुध्द पिण्याचे पाणी २० लिटरचा एक जार ३० रुपये याप्रमाणे घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेंतर्गत असणाऱ्या घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे निसर्गाची वक्रदृष्टी, तर शासनाची दिरंगाई, अशा कात्रीत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली