ओझर्डे शाळेत मॉडेल स्कूल योजनेअंतर्गत विविध कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:01+5:302021-04-03T04:24:01+5:30
रेठरे धरण : माझी शाळा आदर्श शाळा या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा ओझर्डे (ता. वाळवा) येथे मॉडेल स्कूल योजनेअंतर्गत ...

ओझर्डे शाळेत मॉडेल स्कूल योजनेअंतर्गत विविध कामे
रेठरे धरण : माझी शाळा आदर्श शाळा या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा ओझर्डे (ता. वाळवा) येथे मॉडेल स्कूल योजनेअंतर्गत विविध कामांचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्या संध्या आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ओझर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘माझी शाळा आदर्श शाळा’ या उपक्रमामध्ये मॉडेल स्कूल बनवण्यासाठी निवड झाली आहे. शाळा परिसरात क्रीडांगणाची सोय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वर्ग सजावट, वर्गखोल्या डिजिटल करणे या सर्व बाबींची पूर्तता करण्यास सुरुवात झाली आहे. मैदान सपाटीकरण व खेळाचे क्रीडांगण तयार करणे, हॅन्ड वॉश स्टेशन, शौचालय दुरुस्ती आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे उद्घाटन वाटेगावच्या जिल्हा परिषद सदस्या संध्या पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील आंबी, ओझर्डेच्या सरपंच मंगल दिनकर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अपर्णा लोहार, बालाजी पाटील,केंद्रप्रमुख शांता पाटील, ग्रामसेवक कुबेर कांबळे, सुजाता पाटील उपस्थित होत्या. किशोर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. संतोष कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विकास निंबाळकर यांनी आभार मानले. जिल्हा परिषदेचा निधी तसेच लोकसहभागातून या शाळेचे काम करण्यात येणार असून राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांनी शाळेसाठी दहा हजार रुपये मदत केली आहे.