संकष्टीनिमित्त आष्टा येथील गणपती मंदिरात विविध धार्मिक विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:27+5:302020-12-05T05:09:27+5:30

आष्टा : आष्टा येथील पुरातन श्री गणपती मंदिरात मंदिरे उघडल्यानंतरच्या पहिल्याच संकष्टीला विविध धार्मिक कार्यक्रम झाले. साेशल डिस्टन्सिंगचे नियम ...

Various religious rituals at the Ganapati temple at Ashta on the occasion of Sankashti | संकष्टीनिमित्त आष्टा येथील गणपती मंदिरात विविध धार्मिक विधी

संकष्टीनिमित्त आष्टा येथील गणपती मंदिरात विविध धार्मिक विधी

आष्टा : आष्टा येथील पुरातन श्री गणपती मंदिरात मंदिरे उघडल्यानंतरच्या पहिल्याच संकष्टीला विविध धार्मिक कार्यक्रम झाले. साेशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भाविकांना दर्शन देण्यात आले.

आष्टा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुरातन श्री गणपती मंदिर आहे. याठिकाणी एकाच मोठ्या पाषाणात घडविलेली आकर्षक गणपतीची मूर्ती आहे. या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. संकष्टीनिमित्त विश्वस्त चिमणाजी कुलकर्णी यांच्याहस्ते महाअभिषेक करण्यात आला. अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन करण्यात आले. दुपारी महाआरती झाली. त्यानंतर उषा बापट, स्नेहा लिमये, मंजिरी कुलकर्णी व महिलांनी गणपती उपासना केली.

सायंकाळी परिसर शुद्ध करण्यासाठी व कोरोना निर्मूलनासाठी अग्निहोत्र झाले व रात्री महाआरती झाली. विश्वस्त चिमणाजी कुलकर्णी, सुभाष तगारे, गजानन कुलकर्णी, विनायक जोशी, दत्तात्रय जोशी, भैया ताडे, रामचंद्र जोशी व ग्रामोपाध्ये यांनी संयोजन केले.

फाेटाे : ०४१२२०२०-आयएसएलएम-आष्टा गणपती न्यूज

Web Title: Various religious rituals at the Ganapati temple at Ashta on the occasion of Sankashti