पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST2021-01-08T05:27:34+5:302021-01-08T05:27:34+5:30

वांगी : काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी साडेआठ ते ...

Various programs on the occasion of Patangrao Kadam's birthday on Friday | पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम

पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम

वांगी : काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी साडेआठ ते अकरा या कालावधीत आदरांजली वाहण्यात येणार आहे. नाशिक येथील कीर्तनकार अनिल महाराज तुपे यांचे कीर्तन, भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना प्रशासनाने

निवेदनाद्वारे दिली आहे.

कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळी जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जयंतीनिमित्त स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात येत आहे. जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आमदार मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह कदम कुटुंबीय स्मृतिस्थळावर येणार आहेत. याशिवाय राज्यभरातून राजकीय नेतेमंडळी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी येणार आहेत. जयंतीनिमित्त जिल्ह्यातून आणि पलूस-कडेगाव मतदारसंघातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

फोटो : डॉ. पतंगराव कदम यांचा फोटो वापरावा.

Web Title: Various programs on the occasion of Patangrao Kadam's birthday on Friday