शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

वारणा पाणी योजना २५० कोटींची; समडोळीतून पाणी उचलून सांगली, कुपवाडला पुरवठा

By शीतल पाटील | Updated: June 29, 2023 13:35 IST

कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यावर उपाय म्हणून वारणा पाणी योजना

शीतल पाटीलसांगली : कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यावर उपाय म्हणून वारणा नदीतून सांगली व कुपवाडला पाणी देण्याची योजना आखली जात आहे. या योजनेचा आराखडा महिन्याभरात तयार होणार आहे. त्यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ताकाळात केंद्र शासनाने युआयडीएसएसएमटीअंतर्गत सांगली व कुपवाड या दोन शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बळकटीसाठी ७९.०२ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली. पण पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् मदन पाटील यांची सत्ताही गेली. त्यामुळे योजनेचे काम रखडले. नव्याने सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने योजनेची कामे हाती घेतली.वारणा उद्भव वगळून शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरणावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यातील निधीतून जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने कुपवाड झोनमधील कापसे वसाहत, शामनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, वान्लेसवाडी व वाघमोडेनगर येथे पाण्याची टाकी, जॅकवेल ते माळबंगल्यापर्यंतची दाबनलिका, १०२ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था आदी कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात आली.

वास्तविक कृष्णा नदी कोरडी पडू लागल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. त्यासाठी वारणा योजना हाती घेण्यात आली. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वारणेतून पाणी न उचलता नवीन टाकी बांधणे, जलवाहिन्या टाकण्याचे काम केले. अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. त्यानंतर काही वर्षे कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले नव्हते. पण यंदा उन्हाळ्यात पुन्हा शहराला पाण्याची टंचाई भासली. काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा वारणा योजनेची गरज भासू लागली आहे.

पाणी माळबंगला केंद्रापर्यंत आणणार

  • मदनभाऊ युवा मंचाकडून सातत्याने वारणा योजनेबाबत पाठपुरावा सुरू होता. अखेर महासभेतही योजना राबविण्याबाबतचा ठराव झाला. आता खासगी कंपनीकडून वारणा योजनेचा आराखडा तयार केला जात आहे.
  • सांगलीवाडी-समडोळी हद्दीत जॅकवेलसाठी जागाही घेण्यात येत आहे. वारणा नदीतून पाणी उचलून ते माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे.
  • त्याशिवाय शामरावनगरसह तीन ते चार ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे नियोजन आहे.
  • २५० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. योजनेचा आराखडा अंतिम झाल्यानंतर निधीसाठी तो शासनाकडे सादर केला जाणार आहे.
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी