वांगी शाळेचे मैदान टकाटक--लोकमतचा दणका

By Admin | Updated: September 1, 2014 23:09 IST2014-09-01T22:06:42+5:302014-09-01T23:09:57+5:30

मैदान तयार करण्यासाठी जागेचा शोध

Vangi school grounds Takatak - Lokmat bunch | वांगी शाळेचे मैदान टकाटक--लोकमतचा दणका

वांगी शाळेचे मैदान टकाटक--लोकमतचा दणका

वांगी : कडेगाव तालुक्यातील वांगी येथील प्राथमिक शाळेच्या मैदानावर साचून राहिलेले पावसाचे पाणी आज ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्याव्दारे बाहेर काढले. ‘लोकमत’च्या दणक्याने ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आल्याने प्राथमिक शाळेचे मैदान आता टका-टक झाले आहे.वांगी ग्रामपंचायतीच्या चुकीच्या नियोजनामुळे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप आले होते. ग्रामपंचायतीला मंजूर झालेला फंड संपवायचा या उद्देशाने गावातील रस्त्याच्या बाजूने मुरूम टाकण्याचे काम सुरू केले. त्यातून राहिलेला मुरूम हा पशुसंवर्धन दवाखाना व जि. प. शाळेच्या मैदानात टाकण्यात आला. मात्र, मुरूम टाकताना पाणी ज्या बाजूने निचरा होते त्याच बाजूने मुरूम टाकल्यामुळे शाळेच्या मैदानात पाणी साचून मैदानाला तळ्याचे स्वरूप आले होते.
याबाबत ‘लोकमत’ने आज सोमवारी ‘शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन आज सोमवारी तातडीने जे.सी.बी. यंत्राव्दारे मैदानाच्या बाजूने नाला काढून साचून राहिलेले पाणी बाहेर काढल्याने मैदान टका-टक झाले आहे. (वार्ताहर)

गाव तेथे क्रीडांगण या योजनेत गावासाठी क्रीडांगण तयार करण्यासाठी आलेला एक लाख रूपयांचा निधी लवकरच खर्च करण्यात येणार असून, मैदान तयार करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.
- मनीषा कांबळे, सरपंच

Web Title: Vangi school grounds Takatak - Lokmat bunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.