वाळवा तालुका सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST2021-04-05T04:24:01+5:302021-04-05T04:24:01+5:30

साखराळे येथे कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत विजयबापू पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अतुल ...

Valva taluka will stand firmly behind the co-operative panel | वाळवा तालुका सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा राहील

वाळवा तालुका सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा राहील

साखराळे येथे कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत विजयबापू पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अतुल भाेसले, आनंदराव पाटील, संजय पाटील, लिंबाजी पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : गेल्या पाच वर्षांत डॉ. सुरेश भाेसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. चांगला दर मिळाल्याने कारखान्याचे सभासद समाधानी आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत वाळवा तालुका सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी व्यक्त केला.

सााखराळे (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भाेसले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, सरपंच बाबूराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, मनोज पाटील, कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अतुल भाेसले म्हणाले, कृष्णा कारखाना, राजारामबापू कारखाना ही सहकारातील मंदिरे आहेत. या दोन्ही संस्थांमुळे लोकांची प्रगती झाली. पाच वर्षांपूर्वी डॉ. सुरेशबाबांकडे सभासदांनी सत्ता दिली. त्यांनी अनंत अडचणींतून मार्ग काढत गेल्या ५ वर्षांत कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. आज कारखान्याचा उच्चांकी उतारा व दर पाहता, कृष्णा कारखान्याने पुन्हा एकदा राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे.

प्रा.डॉ. सूरज चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भास्कर पाटील, सुबराव डांगे, विश्वासराव माने, मानसिंग पाटील, प्रकाश चव्हाण, हंबीरराव पाटील, अमोल कुंभार, अविनाश पाटील उपस्थित होते.

Web Title: Valva taluka will stand firmly behind the co-operative panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.