वैष्णवी शिंदेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:48 IST2021-03-04T04:48:44+5:302021-03-04T04:48:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांची कन्या वैष्णवी शिंदेची महाराष्ट्र महिला क्रिकेट ...

Vaishnavi Shinde selected for Maharashtra Cricket Team | वैष्णवी शिंदेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

वैष्णवी शिंदेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांची कन्या वैष्णवी शिंदेची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे यांची ती नात आहे.

महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात सांगली जिल्ह्यातून स्मृती मानधना व शिवानी बिट्टेनंतर तिसरी क्रिकेटपटू व पहिली यष्टिरक्षक म्हणून निवड होण्याचा मान वैष्णवीला मिळाला. तिने यापूर्वी शिवाजी विद्यापीठाचे कर्णधारपद दोनवेळा सांभाळले आहे. ती १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला संघातून दोनवेळा खेळली आहे. वर्षापूर्वी २३ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातही तिची निवड झाली होती.

ती सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची खेळाडू असून, श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. २०१४ पासून ती लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचालित लठ्ठे क्रिकेट अकादमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब यांच्याकडे धडे गिरवत आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय बजाज, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतिनाथ कांते, सचिव सुहास पाटील, प्रा. महावीर कुंभोजे, सहायक प्रशिक्षक हर्षद ऊर्फ शुभम आवळे यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Vaishnavi Shinde selected for Maharashtra Cricket Team