वैष्णवी शिंदे हिचा आष्टा येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:48+5:302021-02-06T04:48:48+5:30
आष्टा : महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू वैष्णवी वैभव शिंदे क्रिकेट खेळात राष्ट्रीय पातळीवर आष्टा नगरीची कीर्ती वाढवतील, ...

वैष्णवी शिंदे हिचा आष्टा येथे सत्कार
आष्टा : महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू वैष्णवी वैभव शिंदे क्रिकेट खेळात राष्ट्रीय पातळीवर आष्टा नगरीची कीर्ती वाढवतील, असा विश्वास माजी नगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक झुंजारराव शिंदे यांनी व्यक्त केला.
येथील राजाराम शिक्षण संस्थेच्या विलासराव शिंदे विद्यालयात वैष्णवी शिंदे पुणे येथे झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, आष्टा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश रुकडे, उद्योगपती नितीन झंवर, राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, प्राचार्य विशाल शिंदे, बाबासाहेब सिद्ध, शेरनवाब देवळे, वरदराज शिंदे उपस्थित होते.
फोटो : ०५०२२०२१-आयएसएलएम-आष्टा सत्कार न्यूज
आष्टा येथे वैष्णवी शिंदे हिचा जिल्हा बँकेचे संचालक झुंजारराव शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी झुंजारराव पाटील, वैभव शिंदे, विशाल शिंदे, नितीन झंवर, प्रकाश रूकडे, बाबासाहेब सिद्ध, वरदराज शिंदे, शेरनवाब देवळे उपस्थित होते.