शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वैष्णवी शिंदे उत्कृष्ट ड्रोन पायलट, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान; देशातील चार महिलांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:51 IST

देशातील चार महिलांची निवड : सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव

देवराष्ट्रे : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील वैष्णवी परशुराम शिंदे यांनी उत्कृष्ट ड्रोन पायलट म्हणून काम केल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना राष्ट्रपती भवन यांच्याकडून आमंत्रण पत्रिका प्राप्त झाली आहे. यासाठी देशातील चार महिलांची निवड करण्यात आली आहे.पंतप्रधान मिनी ड्रोन योजना खास महिलांसाठी शासनाने राबविली होती. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १५ महिलांनी सहभाग नोंदवला होता. तसेच देशातील विविध राज्यातील अनेक महिलांनी यामध्ये सहभागी घेतला होता. यासाठी या सर्व महिलांना गुजरात येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. गुजरात येथे १५ दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये मोहिते वडगावच्या वैष्णवी शिंदे यांनी उत्कृष्ट पद्धतीने ड्रोन चालविला व त्यांची कामगिरीही उत्कृष्ट होती. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांची निवड केली आहे. या निवडीबाबतचे पत्र राष्ट्रपती भवनकडून वैष्णवी शिंदे यांना प्राप्त झाले आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरांतील घटकांचा समावेश असावा, या हेतूने सरकारकडून काही नागरिकांना विशेष निमंत्रित केले जाते. यावर्षी ड्रोन दीदी योजनेत सहभागी असणाऱ्या वैष्णवी शिंदे यांना राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून विशेष निमंत्रित केले आहे. ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शिंदे यांची केंद्र शासनाच्या ड्रोन दीदी योजनेत निवड झाली होती. ड्रोन दीदी योजनेत संधी मिळवून दिल्याबद्दल अभिजित खारगे यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.

यथोचित सन्मानसांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी वैष्णवी शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती यांच्यासोबत स्नेहभोजनवैष्णवी शिंदे यांचा सर्व खर्च सरकारकडून केला जाणार असून त्यांच्यासोबत अजून एका सहकाऱ्याला कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येईल. दिल्लीत राष्ट्रपती यांच्यासोबत या निमंत्रित पाहुण्यांना स्नेहभोजनाचा आस्वादही घेता येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Womenमहिला