औदुंबर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वैजनाथ महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:08+5:302021-01-13T05:11:08+5:30

औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाच्या ७८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. वैजनाथ महाजन यांची निवड ...

Vaijnath Mahajan as the President of Audumbar Sahitya Sammelan | औदुंबर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वैजनाथ महाजन

औदुंबर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वैजनाथ महाजन

औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाच्या ७८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. वैजनाथ महाजन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. १४ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत संमेलन होत आहे.

या संमेलनाचे उद्घाटन भिलवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास कोडग व सहायक पोलीस निरीक्षक विशाल जगताप आहेत.

प्रा. महाजन यांनी सलग ३२ वर्षे सांगलीतील मथूबाई गरवारे महाविद्यालयात अध्यापन केले. १९७८ प्रवास हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचे अध्यक्ष व वक्ते म्हणून त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी शंभरावर पुस्तकांना प्रस्तावना लिहिली आहे. जनस्वास्थ्य, आभाळमाया फाउंडेशनच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेेचा भीमराव कुलकर्णी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. कर्नाटक सीमाभागात साहित्य संमेलने उभारण्यात त्यांचे योगदान आहे.

फोटो : वैजनाथ महाजन

Web Title: Vaijnath Mahajan as the President of Audumbar Sahitya Sammelan