लसीकरण आजही राहणार बंद, रात्री उशिरा लस येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:54+5:302021-05-18T04:27:54+5:30
सांगली : लसीचा पुरवठा झाला नसल्याने मंगळवारी लसीकरण बंदच राहणार आहे. लस नेण्याचा निरोप मिळाल्याने मंगळवारी व्हॅन पुण्याला पाठविली ...

लसीकरण आजही राहणार बंद, रात्री उशिरा लस येण्याची शक्यता
सांगली : लसीचा पुरवठा झाला नसल्याने मंगळवारी लसीकरण बंदच राहणार आहे. लस नेण्याचा निरोप मिळाल्याने मंगळवारी व्हॅन पुण्याला पाठविली जाणार आहे. तेथून रात्री उशिरा लस येईल, त्यामुळे बुधवारी दुपारी लसीकरण सुरू होईल.
लस मिळत नसल्याने गुरुवारपासून लसीकरण ठप्प झाले आहे. उपलब्ध हजारभर लसींमधून जेमतेम लसीकरण सुरु आहे. सोमवारी फक्त ५९३ जणांना लस मिळू शकली. ४४ ते ६० वयोगटातील १७२ जणांना व ६० वर्षांवरील ३८९ लाभार्थींना लस मिळाली. महापालिका क्षेत्रात लसीकरण पूर्ण बंद राहिले. सोमवारअखेर एकूण लसीकरण ६ लाख ४८ हजार ६६२ इतके झाले. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण पूर्णत: बंद आहे. खासगी रुग्णालयांतही लस उपलब्ध नाही. लसीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत नागरिक हेलपाटे मारत आहेत.