महापालिका क्षेत्रात दहा हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:45+5:302021-02-16T04:28:45+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर, नर्सेस अशा दहा हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या ...

महापालिका क्षेत्रात दहा हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
सांगली : महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर, नर्सेस अशा दहा हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या दहा आरोग्य केंद्रांत या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. अजूनही साडेतीन हजारजणांचे लसीकरण झालेले नाही.
महापालिका क्षेत्रात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या लसीकरणासाठी महापालिकेकडून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, लिंक वर्कर्स, डाॅक्टर, सफाई कर्मचाऱ्यांसह खासगी रुग्णालयातील डाॅक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार १३ हजार ३५ जणांची नोंदणी झाली होती.
या मोहिमेंतर्गत ८ हजार २५ आरोग्य कर्मचारी व १६७० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आता या कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्याची तयारीही महापालिकेने पूर्ण केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून हे लसीकरण सुरू आहे.