कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे : नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:36+5:302021-04-06T04:25:36+5:30
शिराळा : शिराळा मतदारसंघातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करावे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा प्रमुख पर्याय आहे, असे प्रतिपादन ...

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे : नाईक
शिराळा
: शिराळा मतदारसंघातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करावे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा प्रमुख पर्याय आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. यावेळी त्यांनी विश्वास उद्योग समुहातील अधिकारी, कर्मचारी यांचे कुटुंबासह ७ ते ९ एप्रिल दरम्यान शिराळा व चिखली येथे लस घेणार आहेत, असे सांगितले.
आमदार नाईक म्हणाले की, कोरोनाचा सध्या वेगाने प्रसार होत आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक नागरिक मुंबई, पुणे आदी ठिकाणी आहेत. हे नागरिकही आपल्या गावाकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे दक्षता घेणे आवश्यक आहे. या नागरिकांनी आपल्याबरोबर गावातील नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालय, कोकरूड ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. याठिकाणी जाऊन नागरिकांनी लस घ्यावी, ही लस सुरक्षित असून, लसीबाबत कोणतीही भीती बाळगू नये, असेही त्यांनी सांगितले.