लसीकरण, कोविड चाचण्यांबाबत सुधारणा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST2021-04-23T04:28:52+5:302021-04-23T04:28:52+5:30

कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी आ. सुधीर गाडगीळ व भाजप पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली ...

Vaccination, covid tests should be improved | लसीकरण, कोविड चाचण्यांबाबत सुधारणा करावी

लसीकरण, कोविड चाचण्यांबाबत सुधारणा करावी

कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी आ. सुधीर गाडगीळ व भाजप पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लसीकरण प्रक्रिया व कोविडबाबत होणाऱ्या चाचण्यांबाबत यंत्रणेत, सुविधांमध्ये काही बदल होणे गरजेचे आहे, लोकांना विनात्रास या सेवा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

गाडगीळ व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी गाडगीळ म्हणाले की, राज्यात १ मेपासून सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. जनजागृतीमुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे, परंतु लसीकरण केंद्रावर समक्ष पाहणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नियोजनाची कमतरता व अभाव जाणवून आला. लसीकरण होते त्या ठिकाणीच आरटीपीसीआर व अँटिजेन टेस्ट केली जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण हे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तसेच लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींसाठी बैठक व्यवस्था नाही. काही केंद्रांवर वीज नसते. अशा ठिकाणी इनव्हर्टर बसविणे गरजेचे आहे. केंद्रावर कर्मचारी वर्ग, आरोग्य कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची संख्या कमी आहे. गर्दीवर नियंत्रण व सुरक्षित अंतर राखण्यासाठी १ पोलीस व १ होमगार्डची नेमणूक होणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी चौधरी यांनी या सर्व मुद्द्‌यांवर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, भाजपचे धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील, आश्रफ वांकर, श्रीकांत वाघमोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Vaccination, covid tests should be improved