सागाव आरोग्य केंद्रामार्फत २ हजार ८०० लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:05+5:302021-04-10T04:26:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील आतापर्यंत २,८३२ लोकांचे कोविड लसीकरण ...

सागाव आरोग्य केंद्रामार्फत २ हजार ८०० लोकांचे लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील आतापर्यंत २,८३२ लोकांचे कोविड लसीकरण करण्यात आले असून अद्यापही असंख्य नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. सध्या मात्र लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद आहे.
सागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सागावसह कणदूर, ढोलेवाडी, पुनवत, शिराळे खुर्द, वाडीभागाई, नाटोली, चिखली व भाटशिरगाव ही गावे येतात. यातील सागाव, चिखली, नाटोली, कणदूर, पुनवत येथे आरोग्य उपकेंद्रे आहेत. सुरुवातीला सागाव येथे कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. सर्व गावातील असंख्य नागरिकांनी सागाव येथे जाऊन लस घेतली.
सागावनंतर चिखली व पुनवत या दोन आरोग्य उपकेंद्रामध्येही लसीची सोय करण्यात आली. सर्व गावातील नागरिक याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
चौकट -
गावनिहाय लसीकरण (दि. ८ एप्रिल अखेर)
गावचे नाव पुरुष स्त्रिया एकूण
सागाव ३८१ ४०० ७८१
कणदूर ८८ १०४ १९२
पुनवत २१२ २४२ ४५४
शिराळे खुर्द १२३ १५७ २८०
ढोलेवाडी ६५ ६७ १३२
वाडीभागाई १८ ११ २९
नाटोली १६२ १८४ ३४६
चिखली. २६४ २४८ ५१२
भाटशिरगाव ७१ ३५ १०६
चौकट -
ग्रामपंचायतींचे सहकार्य
आपापल्या गावातील नागरिकांना लसीकरणास प्रवृत्त करण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच सर्व गावातील ग्रामपंचायतींनी प्रोत्साहन दिले आहे. काही गावात तर ध्वनिक्षेपकांवरून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. लसीकरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली समूह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, स्टाफ नर्स व आशा स्वयंसेविका परिश्रम घेत आहेत.