१८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण सुरू, ४५ वर्षांवरील मात्र बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:49+5:302021-05-03T04:21:49+5:30
सांगली : जिल्ह्याला शुक्रवारपासून लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंदच आहे. १८ ते ४५ वयोगटांसाठी ...

१८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण सुरू, ४५ वर्षांवरील मात्र बंदच
सांगली : जिल्ह्याला शुक्रवारपासून लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंदच आहे. १८ ते ४५ वयोगटांसाठी ७,५०० डोस मिळाले असून, शनिवारपासून (दि.१) लसीकरण सुरू झाले आहे.
लसीकरणासाठी नागरिक गर्दी करत असताना लसीचा पुरवठा मात्र ठप्प झाला आहे. शुक्रवारी २० हजार डोस आल्यानंतर शनिवारी ते संपलेही. त्यानंतर रविवारपर्यंत पुरवठा झालेला नाही. संध्याकाळी उशिरापर्यंत लस नेण्यासाठी पुण्यातून निरोपही मिळालेला नव्हता, त्यामुळे सोमवारी लसीकरण बंदच राहणार आहे. दरम्यान, १८ ते ४४ वयोगटांसाठी राज्य शासनाकडून साडेसात हजार डोस मिळाले. त्यातून रविवारपर्यंत १,६६१ तरुणांना लस देण्यात आली.
चौकट
तरुणांसाठी येथे सुरू आहे लसीकरण
१८ ते ४५ वर्षे वयोगटांसाठी सांगलीत जामनगर, मिरजेत समतानगर आरोग्य केंद्रे, तसेच कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रे, इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय व विटा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. पूर्वनोंदणी केल्यानंतरच तेथे लस मिळते. १ मे रोजी ७१२ जणांचे लसीकरण झाले. रविवारी (दि.२) ९३८ जणांना मिळाली.