जिल्ह्यात १७,८१६ जणांचे दिवसभरात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:41+5:302021-04-23T04:29:41+5:30

मिरजेत प्रभाग क्रमांक १० मध्ये महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ...

Vaccination of 17,816 persons in the district during the day | जिल्ह्यात १७,८१६ जणांचे दिवसभरात लसीकरण

जिल्ह्यात १७,८१६ जणांचे दिवसभरात लसीकरण

मिरजेत प्रभाग क्रमांक १० मध्ये महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १७ हजार ८१६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. आजवरचे एकूण लसीकरण ४ लाख ७३ हजार ५१९ इतके झाले आहे. लस घेण्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आघाडीवर असून आजवर १६ हजार ९९९ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

मंगळवारी लसीचे ४५ हजार डोस मिळाल्याने जिल्ह्यात लसीकरणाला गती मिळाली. बुधवारी व गुरुवारी जोमाने लसीकरण झाले. गुरुवारी १४ हजार ३०५ जणांनी पहिला डोस, तर ३ हजार ५११ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. आजअखेर ४ लाख ३४ हजार २२९ जणांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३९ हजार २९० आहे.

गुरुवारी ग्रामीण भागात १२ हजार ६६० जणांचे लसीकरण झाले. निमशहरी भागात १ हजार ९८७, तर महापालिका क्षेत्रात २ हजार ६७१ जणांनी लस घेतली. खासगी रुग्णालयांत ४९८ जणांचे लसीकरण झाले.

चौकट

लसीचा जेमतेम साठा

गुरुवारी संध्याकाळपर्यंत लसीचे सुमारे सात हजार डोस शिल्लक होते. शुक्रवारी सकाळी नव्याने पुरवठ्याची अपेक्षा आहे, अन्यथा लसीकरण सकाळी ११ पर्यंतच ठप्प होण्याची भीती आहे.

Web Title: Vaccination of 17,816 persons in the district during the day