पंचशीलनगर येथे १०० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST2021-02-05T07:19:54+5:302021-02-05T07:19:54+5:30
संजयनगर : महापालिका प्रशासनाच्यावतीने पंचशीलनगरमधील शिवाजी हौसिंग सोसायटीमध्ये असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात साेमवारी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते कोविड लसीकरणाचा प्रारंभ ...

पंचशीलनगर येथे १०० जणांचे लसीकरण
संजयनगर : महापालिका प्रशासनाच्यावतीने पंचशीलनगरमधील शिवाजी हौसिंग सोसायटीमध्ये असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात साेमवारी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते कोविड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. या परिसरातील डॉक्टर्स व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
आयुक्त कापडणीस यांनी उपस्थित डॉक्टरांशी वैद्यकीय सुविधा, अडीअडचणींबाबत संवाद साधला. यावेळी परिसरातील डॉ. आर. आर. हेर्लेकर, सौरभ पटवर्धन, सचिन माळी, सचिन पटकुरे, निधी पटवर्धन, कोमल नेटवे, सीमा माने, हीना पेंढारे यांच्यासह त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांनी मोहिमेबाबत माहिती दिली.
माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेविका शुभांगी साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, उपायुक्त राहुल रोकडे, डॉ. वैभव पाटील, गजानन साळुंखे, संजय कांबळे, नीलम पवार, रेश्मा काटे, योजना लांडगे, विद्या खांडेकर, हर्षला राऊत, स्नेहल चोरमुले, वैशाली चाळके, पूजा शेलार गौरी लांडगे, रोहिणी झेंडे, रुग्णालयातील सर्व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
फोटो : २५ डी १६
ओळ :
आयुक्त कापडणीस यांच्या उपस्थितीत डॉक्टर्सना लस देऊन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. सुनील आंबोळे, कांचन कांबळे, शुभांगी साळुंखे, वैभव पाटील आदी उपस्थित होते.