कवठेमहांकाळ तालुक्यात सचिव पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:08+5:302020-12-05T05:07:08+5:30
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील विकास सोसायट्यांची सचिव पदे रिक्त असून, ती पदे भरण्याची मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांतून ...

कवठेमहांकाळ तालुक्यात सचिव पदे रिक्त
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील विकास सोसायट्यांची सचिव पदे रिक्त असून, ती पदे भरण्याची मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील विकास सोसायटीचे सचिव पदे अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. तालुक्यात एकूण ७१ सहकारी सोसायट्या असून, फक्त १९ अधिकृत सचिव कार्यरत आहेत. उर्वरित खासगी संस्थेने सातजणांची नेमणूक मिळून २६ सचिवपदे कार्यरत आहेत. ७१ विकास संस्था आणि १९ अधिकृत सचिव यामुळे शेतकऱ्यांची कामे होत नाहीत. सचिव पदे भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून व नागरिकांतून होत आहे.
एका सचिवाकडे चार ते पाच विकास संस्थांचा अतिरिक्त कारभार असतो. त्यांच्याकडे कर्ज वाटप, कर्ज वसुली, पीक विमा, कर्जमाफी, बँकेची माहिती, शासनाची माहिती देणे आदी कामे करणे बंधनकारक असून, शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. काम जास्त, दाम कमी अशी अवस्था या सचिवांची झाली असून, खासगी संस्थांनी सचिव पदे भरणे गरजेचे आहे. शासनाने सचिव पदे भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कोट
कवठेमहांकाळ तालुक्यातील विकास सोसायटीची सचिव पदे कमी असून, त्यांचा कामकाजावर परिणाम होत आहे. शासनाने आणि खासगी संस्थांनी सचिव पदे भरावीत. - बी. डी. मोहिते, सहा. निबंधक, कवठेमहांकाळ