सांगलीच्या व्ही. पी. इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:57+5:302021-08-25T04:30:57+5:30
परिषदेचे उद्घाटन एनएसडीएलचे माजी उपाध्यक्ष तसेच प्रख्यात गुंतवणूक सल्लागार चंद्रशेखर टिळक यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी सायबर ट्रस्टचे ...

सांगलीच्या व्ही. पी. इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
परिषदेचे उद्घाटन एनएसडीएलचे माजी उपाध्यक्ष तसेच प्रख्यात गुंतवणूक सल्लागार चंद्रशेखर टिळक यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी सायबर ट्रस्टचे विश्वस्त प्राचार्य डॉ. व्ही. एम. हिलगे, आर. ए. पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आर. ए. शिंदे यांनी दिली.
या परिसंवादासाठी आलेल्या लेखांचे दोन सत्रांमध्ये सादरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मिरज येथील प्राचार्या डॉ. एस. एस. कुलकर्णी, नवी दिल्लीचे डॉ. प्रकाश रोडीया, चंदीगडचे डॉ. नवजीत कौर, तसेच राजेंद्र देशपांडे हे तज्ज्ञ मार्गदर्शक विविध सत्रांचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मस्कत येथील डॉ. काबली सुब्रम्हण्यन आणि यूएईच्या डॉ. क्रिस्तीना कॉट्रा यांचे यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती परिषदेच्या संयोजक डॉ. नीता देशपांडे यांनी दिली. परिषदेचा समारोप डॉ. एम. एम. अली यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या लेखांमधून सर्वोत्कृष्ट लेखास सायबरचे संस्थापक प्राचार्य डॉ. ए. डी. शिंदे यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.