रेडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत उत्तम पाटील, ओंकार पन्हाळकर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:38+5:302021-01-02T04:22:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : रेड (ता. शिराळा) येथील युवा मित्र विक्रम सातपुते आणि अक्षय सातपुते यांच्यावतीने आयोजित ...

Uttam Patil and Omkar Panhalkar won the marathon in Red | रेडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत उत्तम पाटील, ओंकार पन्हाळकर प्रथम

रेडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत उत्तम पाटील, ओंकार पन्हाळकर प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : रेड (ता. शिराळा) येथील युवा मित्र विक्रम सातपुते आणि अक्षय सातपुते यांच्यावतीने आयोजित मिशन इंडियन आर्मी, महाराष्ट्र पोलीस भरती मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये पाच किलोमीटर धावणे स्पर्धेत उत्तम पाटील (वारणानगर) याने तर १६०० मीटर धावणे या स्पर्धेत ओंकार पन्हाळकर (इचलकरंजी) याने प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर नायकवडी उपस्थित होते. महादेव जाधव, यशवंत पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी अमृत पाटील, जालिंदर पाटील, बाबासाहेब धुमाळ, नागेश वाघ, रमेश चौगुले यांचे सहकार्य लाभले. प्रहार संघटनेचे शिराळा तालुकाप्रमुख श्रीराम नांगरे -पाटील यांनी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून दिली. याप्रसंगी महेश सातपुते, विकास सातपुते, अण्णा पाटील, सुनील निकम, प्रकाश पाटील, अरविंद सातपुते, संदीप सातपुते उपस्थित होते.

Web Title: Uttam Patil and Omkar Panhalkar won the marathon in Red