उटगीत सत्तांतर; भाजपची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:50+5:302021-01-20T04:27:50+5:30

माडग्याळ : उटगी (ता. जत) येथील ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन येथे भाजपने एकहाती सत्ता मिळविली. उटगीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले ...

Utgeet Sattantar; BJP's bet | उटगीत सत्तांतर; भाजपची बाजी

उटगीत सत्तांतर; भाजपची बाजी

माडग्याळ : उटगी (ता. जत) येथील ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन येथे भाजपने एकहाती सत्ता मिळविली. उटगीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. गेली दहा वर्षे येथे काँग्रेसची सत्ता होती. यावेळी निवडणूक तिरंगी होणार, असे चित्र रंगले होते. मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी माघारी घेऊन एकत्र लढण्याचा निर्णय झाला. येथे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बसवराज बिरादार स्वत: तीन प्रभागांच्या निवडणुकीत उतरल्याने त्यांच्या विरोधात त्यांच्याच गटाचे माजी सोसायटी अध्यक्ष जिनेसाहेब खानापुरे यांनी आव्हान उभे केले होते. मात्र बसवराज बिरादार यांनी खानापुरे यांचा दारूण पराभव करत पूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणले. त्यांची काँग्रेसच्या भीमराय बिरादार यांच्याकडून सत्ता खेचून आणली. भाजपने यावेळी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Web Title: Utgeet Sattantar; BJP's bet