सांगलीत प्लास्टिकच्या बॅगचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:53+5:302021-06-20T04:18:53+5:30
सांगली : राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना, शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरीबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे ...

सांगलीत प्लास्टिकच्या बॅगचा वापर
सांगली : राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना, शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरीबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. किरकोळ तसेच ठोक विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर पुन्हा सुरू झाला आहे.
------------
वाहनधारक त्रस्त, तर प्रवाशांच्या खिशाला झळ
सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करण्यासाठी बसची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. पेट्रोल दरवाढीचा चढता आलेख कायम राहत असल्याने, इंधन दरवाढीने वाहनधारक त्रस्त झाल्याने यांचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. सध्या पेट्रोलने शंभरी पार केल्याने वाहनधारकांबरोबर प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
----------
ग्रामीण भागात कोरोनाचा विसर
सांगली : ग्रामीण भागात सद्यस्थितीत कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह असणारे आणि त्यांचे कुटुंबीय बिनधास्त बाहेर फिरत आहेत. यामुळे कोविडचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी करून नये म्हणून स्थानिक प्रशासनाने निर्बंध लादण्याची व अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
-----------
सांगलीत बँकासमोर पार्किंगची समस्या
सांगली : शहरात काही राष्ट्रीयीकृत बँका बाजारपेठ भागात असल्याने तेथे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. बँकेत येणारे ग्राहक दुकानांसमोर वाहने लावतात. मात्र त्यावरून काहीवेळा वादही निर्माण होतात. त्यामुळे बँक प्रशासनाने पार्किंगची सोय करण्याची गरज आहे.
-----------
जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची गरज
सांगली : ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत, त्यांचे पावसाळ्यात खते वाहतुकीसाठी मोठे हाल होतात. त्यामुळे संबंधित विभागाने सर्व्हे करून व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणंद रस्ते तयार करण्याची गरज आहे. पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबणार आहेत.
-------------
उपबाजारांची अवस्था वाईट
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत येणाऱ्या चार उपबाजारांपैकी तीन उपबाजारांची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बाजार समिती पदाधिकारी आणि प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.
--------------
बालविवाहांवर प्रशासनाची नजर
सांगली : जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यानुषंगाने आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण, प्रशासनाचे नजर चुकवून अनेक बालविवाह होत आहेत. याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची नागरिकांची मागणी आहे.