शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यात अक्षतांसाठी तांदळाऐवजी फुले वापरा, सांगलीतील चिकुर्डे ग्रामसभेत ठराव

By संतोष भिसे | Updated: January 29, 2024 17:53 IST

ऐतवडे बुद्रुक : हिंदू धर्मियांनी विवाह सोहळ्यात अक्षता म्हणून तांदळाचा वापर बंद करावा, अन्नधान्याची नासाडी थांबवावी असा ठराव चिकुर्डे ...

ऐतवडे बुद्रुक : हिंदू धर्मियांनी विवाह सोहळ्यात अक्षता म्हणून तांदळाचा वापर बंद करावा, अन्नधान्याची नासाडी थांबवावी असा ठराव चिकुर्डे (ता. वाळवा) येथील ग्रामसभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच रणजित पाटील होते.प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विविध अनुचित सामाजिक प्रथा, परंपरांबद्दल ग्रामसभेत चर्चा झाली.  सरपंच पाटील यांनी लग्नसोहळ्यातील तांदळाच्या नासाडीचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, देशात लाखो लोकांना एकाच वेळचे अन्न मिळत असल्याच्या अन्नधान्याची नासाडी करण्याचा अधिकार आपल्याला नाही. लग्नसोहळ्यात कित्येक किलो तांदूळ अक्षतांच्या स्वरुपात उधळल्या जातात. उपस्थितांच्या पायदळी तुडविले जातात. यामुळे अक्षतांचे पावित्र्यही नाहीसे होते. या स्थितीत अक्षतांऐवजी अन्य पर्यायांचा विचार हिंदू धर्मियांनी करावा. तांदळाचा सरसकट वापर बंद करावा. वधु-वराशेजारी उभे असणारे मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी अक्षता टाकाव्यात. अन्य उपस्थितींना टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करावा.सरपंच पाटील यांच्या प्रस्तावाचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. चांगल्या परंपरा सुरु करण्यात चिकुर्डे गाव नेहमीच अग्रेसर असल्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावेळी उपसरपंच अलका मिरजकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णात पवार, सोसायटीते अध्यक्ष बाबासाहेब खाेत, दौलत पवार, अशोक सरनाईक, बाबासाहेब मिरजकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फुलांच्या पाकळ्यांचा वापर व्हावासरपंच पाटील म्हणाले, अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचाही वापर करता येईल. यातून धान्याची नासाडी टळेल, शिवाय फुलांच्या वापराने फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतील.

लग्नासारख्या विविध सोहळ्यांतील अनुचित प्रथा, परंपरा बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. तांदूळ न वापरण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल याचा विश्वास आहे. - रणजीत पाटील, सरपंच.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नgram panchayatग्राम पंचायत