‘टेंभू’चे थेंब न् थेंब पाणी वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:31+5:302021-06-03T04:19:31+5:30
आटपाडी : थेंब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाणी करीत रानोमाळ भटकणाऱ्या पूर्वजांच्या हालअपेष्टांना समोर ठेवून अनेकांच्या त्यागातून टेंभू ...

‘टेंभू’चे थेंब न् थेंब पाणी वापरा
आटपाडी : थेंब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाणी करीत रानोमाळ भटकणाऱ्या पूर्वजांच्या हालअपेष्टांना समोर ठेवून अनेकांच्या त्यागातून टेंभू योजनेद्वारे कृष्णामाईचे आलेले थेंब न् थेंब पाणी वापरा, त्याचा सदुपयोग करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे खानापूर मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर यांनी व्यक्त केले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने १०० कार्यकर्त्यांच्या दारात पिंपळाची रोपे लावण्याचा संकल्प राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे यांनी केला आहे. तळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मोडकळीस आलेल्या समाज मंदिराच्या जागी नवीन समाज मंदिर उभारणे आणि करगणी - तळेवाडी रस्त्यावरील करगणीजवळच्या वाहून गेलेल्या फरशी पुलाच्या जागी मोठा पूल उभारावा, या मागण्या युवकांच्या वतीने करण्यात आल्या. प्रास्ताविक अमित ऐवळे यांनी केले. यावेळी सादिक खाटीक, पोपट जावीर, किसन मोरकाने, गुलाब ऐवळे, सुमीत सुरेश कांबळे, अजित कांबळे उपस्थित होते.