सावळीतील उरूस, यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST2020-12-08T04:23:12+5:302020-12-08T04:23:12+5:30

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील साकडे सुलतान यांचा उरूस व बसवेश्वर देवाची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय ...

Urus in the shade, Yatra canceled | सावळीतील उरूस, यात्रा रद्द

सावळीतील उरूस, यात्रा रद्द

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील साकडे सुलतान यांचा उरूस व बसवेश्वर देवाची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, दर्गा ट्रस्टी, बसवेश्वर ट्रस्टी व पोलीस प्रशासन यांच्या बैठकीत घेण्यात आला. केवळ मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडण्याचा निर्णयही घेण्यात आला.

साकडे सुलतान यांचा उरूस व बसवेश्वर देवाच्या यात्रेसाठी प्रत्येकवर्षी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे उरूसासाठी येणाऱ्या भाविकांमधून कोरोना महामारीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थ, भाविकांच्या आरोग्याचा विचार करून बैठकीत उरूस रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सरपंच श्रीकांत डोंगरे, उपसरपंच गजानन गाडवे, सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Urus in the shade, Yatra canceled