कसबे डिग्रजचा उरूस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:35+5:302021-04-12T04:23:35+5:30

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हजरतपीर गैबीसाब इमामशा, तानापिरसाब यांचा उरूस ...

Urus of Kasbe Digraj canceled | कसबे डिग्रजचा उरूस रद्द

कसबे डिग्रजचा उरूस रद्द

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हजरतपीर गैबीसाब इमामशा, तानापिरसाब यांचा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. हा उरूस दि. १४ ते १६ एप्रिल रोजी होणार होता. शासनाच्या दिलेल्या आदेशानुसार उरूस रद्द केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव नलावडे यांनी दिली.

उरूस कमिटी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत उरुस रद्दचा निर्णय झाला. यावेळी सरपंच किरण लोंढे, उपसरपंच सागर चव्हाण, माजी उपसरपंच प्रमोद चव्हाण, संदीप निकम, संजय शिंदे, आरिफ खाटीक उपस्थित होते.

कसबे डिग्रज गावचा उरूस हा जर वर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पासून सुरू होतो. सलग तीन दिवस होणाऱ्या यात्रेमध्ये धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरच वेगवेगळ्या मनोरंजनाच्या उपक्रमातून उरूस साजरा केला जातो. यदा कोरोनाचे गांभीर्य पाहता ग्रामस्थांनी उरूस साधेपणाने साजरा करत प्रशासनाला सहकार्य करावे तसेच या उरुसासाठी येणाऱ्या पै-पाहुणे व नातेवाइकांना निमंत्रण न देता घरगुती पद्धतीने सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत, असे आवाहन आनंदराव नलावडे यांनी केले आहे.

Web Title: Urus of Kasbe Digraj canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.