म्हैसाळ योजनेच्या पाच टप्प्यात ४५ पंपाद्वारे उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:06+5:302021-08-23T04:29:06+5:30

पूर येऊन गेल्यानंतर म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकात वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपसा करून जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील ...

Upsa by 45 pumps in five phases of Mahisal Yojana | म्हैसाळ योजनेच्या पाच टप्प्यात ४५ पंपाद्वारे उपसा

म्हैसाळ योजनेच्या पाच टप्प्यात ४५ पंपाद्वारे उपसा

पूर येऊन गेल्यानंतर म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकात वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपसा करून जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील तलाव भरण्याचे नियोजन आहे. पाच दिवसांपूर्वी म्हैसाळ योजना सुरू झाली असून पूर्ण क्षमतेने उपसा सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील १०, दुसऱ्या टप्प्यातील ११, तिसऱ्या टप्प्यातील ९, चाैथ्या टप्प्यातील ८, पाचव्या टप्प्यातील ७ पंपाद्धारे पाणी उपसा सुरू आहे. प्रतिसेकंद पाचशे क्युसेक वेगाने कालव्यात विसर्ग सुरू आहे. योजनेच्या पाच टप्प्यातील ७५ पंपांपैकी ४५ पंप सुरू आहेत. मात्र, पावसाळ्यात उपलब्ध झालेल्या पाण्याला सिंचनासाठी मागणी नसल्याने डोंगरवाडी, गव्हाण, बनेवाडी योजना व योजनेचे शाखा कालवे बंद आहेत. सध्या जतपर्यंत पाणी पोहोचले असून या पाण्याने तलाव भरण्यात आल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर होणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Upsa by 45 pumps in five phases of Mahisal Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.