सुरूल तलावातून उपसा : विद्युत मोटारी, केबल, पाईप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:21+5:302021-04-25T04:27:21+5:30
सुरूलच्या पश्चिमेला करमाळा रस्त्यावर हा तलाव असून यातील पाण्याचा भटवाडी (ता. शिराळा) या गावास पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळा ...

सुरूल तलावातून उपसा : विद्युत मोटारी, केबल, पाईप जप्त
सुरूलच्या पश्चिमेला करमाळा रस्त्यावर हा तलाव असून यातील पाण्याचा भटवाडी (ता. शिराळा) या गावास पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळा असून मे महिन्यात पाणीटंचाई जाणवू शकते म्हणून भटवाडीचे सरपंच विजय महाडिक यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना पुढे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईबाबत पत्र दिले होते, तहसीलदार शिंदे यांनी सुरूल तलावास भेट देऊन पाहणी केली असता या तलावात बेकायदेशीरपणे विद्युत पंप टाकलेले पाहिले होते. यावर कारवाई करण्याची सूचना दिली होती.
शनिवारी दुपारी पथकाने तलावाच्या पाण्यातील दोन पाणी उपसा करणारे पंप, विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल व शेतात पाणी नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईप जप्त केल्या.
संदीप शिवाजी पाटील, तुकाराम पांडुरंग पाटील, खंडू बापू पाटील (सुरूल, ता. वाळवा) या शेतकऱ्यांनी बेकायदेशीरपणे पाण्यात पंप टाकून पाण्याची व विजेची चोरी केली होती.