भिलवडी वाचनालयात काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:47+5:302021-02-10T04:26:47+5:30
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यास कक्षात माजी अध्यक्ष काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात ...

भिलवडी वाचनालयात काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे अनावरण
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यास कक्षात माजी अध्यक्ष काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व उपाध्यक्ष चिंतामणी जोग यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
प्रा. महाजन म्हणाले की, काकासाहेब चितळे अनासक्त कर्मयोगी होते. ग्रामीण भागात गुणवान विद्यार्थी आहेत, या गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी भिलवडी वाचनालयात अभ्यास कक्ष सुरू केला आहे. येथे स्पर्धा परीक्षेसाठी सुसज्ज वाचनालय उभारण्यात यावे, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
जोग म्हणाले की, काकासाहेब चितळे सामाजिक जाणीव असणारे उद्योजक होते.
बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सन्मित्र मंडळ यांच्यावतीने राममंदिर येथे ‘सेवाधर्म’ या विषयावर वैजनाथ महाजन यांचे व्याख्यान झाले.
प्रास्ताविक व स्वागत सुभाष कवडे यांनी केले. आभार भू. ना. मगदूम यांनी मानले. या कार्यक्रमास वाचनालयाचे गिरीश चितळे, मकरंद चितळे, निखिल चितळे, जे. बी. चौगुले, डी. आर. कदम, जयंत केळकर उपस्थित होते.
फोटो :
भिलवडी वाचनालयात काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेच्या अनावरणप्रसंगी प्रा. वैजनाथ महाजन, चिंतामणी जोग, गिरीश चितळे, मकरंद चितळे, निखिल चितळे उपस्थित होते.