शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अवकाळी पावसाने द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 13:12 IST

तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी भरेल, अशीच परिस्थिती आहे. अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. पण तांबेऱ्यासह बुरशीचा फैलाव होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात रिमझिम पाऊस

सांगली : तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी भरेल, अशीच परिस्थिती आहे. अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. पण तांबेऱ्यासह बुरशीचा फैलाव होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी साडेअकरानंतर तासगाव, कडेगाव, पलूस, वाळवा आणि खानापूर तालुक्यात रिमझिम अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. सकाळी वायफळे, आरवडे येथे पाऊस झाला. कडेगाव तालुक्यातही ढगाळ हवामान असून नेवरी परिसरात पावसाने हजेरी लावली.

वाळवा तालुक्यातील बोरगाव, ताकारी, नवेखेड, जुनेखेड, फार्णेवाडी, मसुचीवाडी, वाळवा आणि बागणी परिसरात रिमझिम पाऊस पडला. परिणामी परिसरातील ऊस तोडी ठप्प झाल्या. पलूस तालुक्यातील पुणदी, नागराळे परिसरातही पावसाने हजेरी लावल्यामुळे ऊस तोडी थांबल्या. दुधोंडी येथेही तुरळक सरी पडल्या.अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेला द्राक्ष हंगाम अडचणीत आला आहे. घडामध्ये पाणी साचल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी तयार केली जाणारी द्राक्षे मणी तडकल्याने नुकसानीत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष शेतीचेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष मण्यातील तयार साखर कमी होण्याची भीती बागायतदार महादेव पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली