वकील संघटनेच्या सदस्यपदी विक्रांत वडेर, सोनेचा यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:52+5:302021-04-03T04:23:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली वकील संघटनेच्या निवडणुकीत सदस्यपदी ॲड. विक्रांत देवेंद्र वडेर, ॲड. चिराग राजेंद्र सोनेचा आणि ...

Unopposed election of Vikrant Vader and Sonecha as members of Bar Association | वकील संघटनेच्या सदस्यपदी विक्रांत वडेर, सोनेचा यांची बिनविरोध निवड

वकील संघटनेच्या सदस्यपदी विक्रांत वडेर, सोनेचा यांची बिनविरोध निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली वकील संघटनेच्या निवडणुकीत सदस्यपदी ॲड. विक्रांत देवेंद्र वडेर, ॲड. चिराग राजेंद्र सोनेचा आणि ॲड. राजेंद्र पांडुरंग चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित पदाधिकारी निवडीसाठी आता १२ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. यात १५ जागांसाठी १४ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

सांगली वकील संघटनेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून त्यात अध्यक्ष पदासाठी ॲड. संदीप लवटे, ॲड. कुबेर शेडबाळे , उपाध्यक्ष पदासाठी ॲड. धनपाल यळमंते व ॲड. नरेंद्र लाड, सेक्रेटरी पदासाठी ॲड. राजाराम यमगर व ॲड. समीर शेख, सहा. सेक्रेटरी पदासाठी ॲड. शैलेंद्र पाटील आणि ॲड. किरणसिंग ठाकूर या उमेदवारांची नावे वैध ठरली आहेत. तर ॲड. दत्ता वठारे, ॲड. संतोषकुमार सुहासे, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. सुभाष संकपाळ, ॲड. तेजस्विनी रामलिंग कोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक प्रक्रिया होत असलेल्या इतर पदांसाठी अर्ज माघारी घेण्याची ५ एप्रिलपर्यंत मुदत आहे. निवडणूक समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ॲड.एस. व्ही. खाडे, उपाध्यक्ष ॲड. हरीश प्रताप, सेक्रेटरी ॲड. यू. व्ही. लोखंडे, सहसेक्रेटरी ॲड. मायादेवी पाटील, ॲड. जी. आर. कुलकर्णी, ॲड. सचिन एस. पाटील, ॲड. एच. आर. पाटील, ॲड. पी. एम. बेंद्रे यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी बिनविरोध न झाल्यास १२ रोजी मतदान होणार आहे.

Web Title: Unopposed election of Vikrant Vader and Sonecha as members of Bar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.