जत नगरपालिकेत सभापती निवडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:14+5:302021-02-06T04:50:14+5:30
जत : जत नगरपालिका विषय समिती सभापतींच्या शुक्रवारी बिनविरोध निवडी झाल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण ...

जत नगरपालिकेत सभापती निवडी बिनविरोध
जत : जत नगरपालिका विषय समिती सभापतींच्या शुक्रवारी बिनविरोध निवडी झाल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी काम पाहिले.
विषय समिती व निवड झालेले नगरसेवक : पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती : भारती प्रवीण जाधव (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण समिती सभापती : गायत्रीदेवी सुजय शिंदे (काँग्रेस), स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती : बाळाबाई पांडुरंग मळगे (राष्ट्रवादी), सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : नामदेव काळे (काँग्रेस), नियोजन आणि विकास समिती सभापती : उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार (राष्ट्रवादी), शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती : प्रकाश माने (भाजप). पाच विषय समिती सभापती पदापैकी दोन राष्ट्रवादी, दोन काँग्रेस व एक भाजपला मिळाले.
नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, संतोष कोळी व आप्पू माळी, सुजय शिंदे, इराण्णा निडोणी, नीलेश बामणे यांनी सत्कार केला.
चौकट
नाराजीची चर्चा
विशेष सभेसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण एडके, वनिता साळे व भाजपचे नगरसेवक प्रमोद हिरवे, विजय ताड, जयश्री शिंदे गैरहजर होते. ते नारज असल्यामुळे आले नाहीत, अशी चर्चा आहे.
चौकट
भाजपला एक पद
पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. काँग्रेसचे नगरसेवक इकबाल गवंडी यांचे निधन झाल्यामुळे एक जागा रिक्त आहे. या रिक्त जागेमुळे सभापती निवड करताना कोरम पूर्ण होत नव्हता, त्यामुळे भाजपला एक पद देऊन कोरम पूर्ण करण्यात आला.