शिक्षक बँकेची विराेधकांकडून नाहक बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:34+5:302021-02-11T04:28:34+5:30
आटपाडी येथे प्राथमिक शिक्षक समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते. जाधव म्हणाले. विरोधकांच्या काळात कर्जाचा व्याजदर २१ टक्के होता. तो ...

शिक्षक बँकेची विराेधकांकडून नाहक बदनामी
आटपाडी येथे प्राथमिक शिक्षक समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते. जाधव म्हणाले. विरोधकांच्या काळात कर्जाचा व्याजदर २१ टक्के होता. तो आम्ही टप्प्याटप्प्याने कमी केला. १६ लाख रुपयांपर्यंत समान हप्ता कर्जाचा व्याजदर ११.५ टक्के, तर जामीनकी कर्जाचा व्याजदर १३ टक्केपर्यंत खाली आणला आहे. शिवाय आणखी दिलासा देण्याचा शिक्षक समिती नेतेमंडळी व संचालकांचा मानस आहे. सूज्ञ सभासद शांत व समाधानी आहेत. फक्त विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी ओरड सुरू आहे. हे सर्वजण जाणून आहेत.
शिवाय मासिक कायम ठेवी परत करणे, लाखो रुपयांची स्टँप ड्युटी कमी करून हजारो सभासदांना न्याय दिला आहे. मृत संजीवनी ठेव योजनेच्या माध्यमातून २० लाखापर्यंतची कर्जमाफी देऊन दुःखितांचे अश्रू पुसण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. विरोधकांनी इतिहासात एकदा तरी कर्जाचा व्याजदर कमी केल्याचा पुरावा द्यावा. मगच व्याजदरावर तोंड उघडावे. त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. सत्तेसाठी भुकेलेले तोंडसुख घेत आहेत. हे सर्वज्ञात आहे. आम्ही आजपर्यंत सभासदांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व तो यापुढेही चालूच ठेवणार आहोत.
यावेळी तालुका अध्यक्ष शामराव ऐवळे, सरचिटणीस प्रवीण बाड, शिक्षक नेते दीपक कुंभार, संजय कबीर, अजय राक्षे, विश्वास पुजारी, धनाजी देठे, सिद्धार्थ कटरे, श्रीकांत कुंभार, बाबासाहेब शेख, हैबतराव पावणे, सत्यजित भांबुरे, हरिदास जावीर, जोतीराम सोळसे, वामन सोळंकी, भास्करराव डिगोळे, यशवंत मोरे, सत्यवान माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.