अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST2021-01-23T04:28:04+5:302021-01-23T04:28:04+5:30
संशयित धनंजय ऐवळे याने पीडित मुलाला २० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मेडिकलमधून औषधे घेऊन येऊ असे सांगत त्याला ...

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
संशयित धनंजय ऐवळे याने पीडित मुलाला २० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मेडिकलमधून औषधे घेऊन येऊ असे सांगत त्याला दुचाकीवर घेऊन गेला. औषधे घेऊन परत येताना आरोपीने पीडित मुलाला जवळच असलेल्या वन विभागाच्या मोकळ्या जागेतील खाणीजवळ नेऊन त्याला कपडे काढण्यास सांगितले; पण मुलाने विरोध केल्याने ऐवळे याने त्याला मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
यानंतर पीडित मुलगा संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्या पोटात दुखत असल्याचे त्याने आईला सांगितले, तसेच घडलेला प्रकार त्याने वडिलांना सांगितला. यानंतर त्याच्या वडिलांनी कुंडल पोलिसांत घटनेची माहिती दिली. तोपर्यंत धनंजय ऐवळे याने पलायन केले होते.
कुंडल पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. शनिवारी सांगली येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी कुंडल पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संगीता माने करीत आहेत.
फोटो : २२ धनंजय ऐवळे