शहरातील विनापरवाना फलक हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:07+5:302021-09-25T04:28:07+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात विनापरवाना लावलेले फलक अतिक्रमण हटाव विभागाने शुक्रवारी हटविले. रस्त्यावर किंवा विद्युत खांबावर विनापरवाना फलक लावून ...

शहरातील विनापरवाना फलक हटविले
सांगली : महापालिका क्षेत्रात विनापरवाना लावलेले फलक अतिक्रमण हटाव विभागाने शुक्रवारी हटविले. रस्त्यावर किंवा विद्युत खांबावर विनापरवाना फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.
सांगली, मिरज, आणि कुपवाड शहरात अनेक मुख्य मार्ग, चौकांचे सुशोभिकरण केले जात आहे. यातच महापालिका क्षेत्रात विनापरवाना, अनावश्यक आणि शहराचे विद्रुपीकरण करणारे फलक लावण्यास बंदी घातली आहे. तरीही शहराच्या प्रमुख मार्गावर झाडे, विद्युत खांबांवर जाहिरातींचे फलक परवानगी न घेता लावण्यात आले आहेत. हे फलक उतरवून जप्त करण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले होते. त्यानुसार अतिक्रमण हटाव विभागाकडून अमित साळुंखे आणि पथकाने विनापरवाना फलक हटविण्यास सुरुवात केली.
विनापरवाना फलक लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.