शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खटावमध्ये अज्ञाताने फिरवला द्राक्ष बागेत ट्रॅक्टर, सुमारे १२ लाखांचे नुकसान; पोलिसांकडून संशयिताचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:37 IST

शेतकऱ्यांच्या पाठीवर मारा; पण पोटावर मारू नका. बागायतदार शेतकऱ्याच्या वेदना

भिलवडी : खटाव (ता. पलूस) येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजीत आनंदराव पाटील यांच्या द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याची घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री घडली. या घटनेत सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.विश्वजीत पाटील यांच्या घराशेजारी सुमारे दोन एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचे पीक आले होते. अवघ्या महिनाभरात ही द्राक्षे बाजारात जाण्याच्या तयारीत होती. मात्र अज्ञात व्यक्तीने पाटील यांच्या घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्ष बागेत घुसवला व संपूर्ण बागेत फिरवून मोठे नुकसान केले.या घटनेत अंदाजे साडेतीनशे ते चारशे द्राक्ष झाडांचे नुकसान झाले असून बागेतील लोखंडी अँगल, तारा तसेच ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन हंगामात झालेल्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

या घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहिदास पावशे, हवालदार दीपक पाटील व शिपाई स्वप्निल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी फिर्यादी पाटील व परिसरातील शेतकऱ्यांना दिला आहे.दरम्यान, द्राक्षबागेचे नुकसान करण्याचा प्रकार पूर्ववैमनस्य, राजकीय सूडबुद्धी, चोरीचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक शेतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने करण्यात आला काय? याचा शोध भिलवडी पोलिस घेत आहेत.

कठोर कारवाई कराया घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. दोषी व्यक्तीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

काबाडकष्टातून उभारलेल्या द्राक्षबागेचे केलेले नुकसान हे दु:खदायक आहे. यामुळे माझे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर मारा; पण पोटावर मारू नका. - विश्वजीत आनंदराव पाटील, द्राक्ष बागायतदार

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Vandalism in Vineyard Causes Huge Loss; Police Investigate

Web Summary : A vineyard in Khatav, Sangli, suffered significant damage after an unidentified person drove a tractor through it, causing losses estimated at ₹12 lakhs. Police are investigating the incident, suspecting motives such as revenge or deliberate destruction. The farmer is devastated by the loss.