शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:39 AM

culture Sangli- भावार्थाने समृद्ध झालेल्या गझला, हृदयाला भिडणारे शेर आणि मनात दरवळणाऱ्या सुंदर गीतांनी सांगलीत दिवंगत गझलकार इलाही जमादार यांना आदरांजली वाहण्यात आली. संगीतकार, कवी, इलाहीप्रेमी व साहित्यरसिकांनी अभिवादन करतानाच इलाहींच्या गझलांचा या कार्यक्रमातून रसास्वाद घेतला.

ठळक मुद्दे अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती राजमती ग्रंथालयातर्फे सांगलीत 'गझलांजली'

सांगली : भावार्थाने समृद्ध झालेल्या गझला, हृदयाला भिडणारे शेर आणि मनात दरवळणाऱ्या सुंदर गीतांनी सांगलीत दिवंगत गझलकार इलाही जमादार यांना आदरांजली वाहण्यात आली. संगीतकार, कवी, इलाहीप्रेमी व साहित्यरसिकांनी अभिवादन करतानाच इलाहींच्या गझलांचा या कार्यक्रमातून रसास्वाद घेतला.राजमती सार्वजनिक ग्रंथालय व इलाही जमादार मित्र परिवाराच्या वतीने नेमिनाथनगर येथे सांगली ट्रेडर्स सोसायटी सभागृहात 'गझलांजली' कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश पाटील, राजगोंडा पाटील, डी.व्ही. शेट्टी, अशोक रेळेकर, संजीव भरमगुडे, डॉ. नामदेव कस्तुरे, बाळासाहेब मिरजकर, इलाही जमादार यांचे बंधू बालेचांद जमादार, पुतणे सुहान जमादार आदी उपस्थित होते.संगीतकार हर्षित अभिराज यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, इतके मोठे गझलकार आपल्या सांगली जिल्ह्यातील असूनही ते आपल्याकडून दुर्लक्षित राहिले. साहित्यप्रांतात त्यांनी दिलेले हे योगदान रसिक कधीही विसरणार नाहीत. अनेक दिग्ग्ज कलाकारांनी सांगलीचे नाव कला, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात गाजविले. इलाही जमादारसुद्धा अशा दिग्गजांच्या पंक्तीतील आहेत. त्यामुळेच त्यांना त्यांच्या गझलांमधूनच खरी आदरांजली वाहण्यात आली.अभिराज म्हणाले की, इलाही जमादार हे मला गुरुस्थानी होते. त्यांच्या गझलांचे कौतुक केवळ मराठी रसिकांनीच केले नाही, तर दिवंगत लोकप्रिय गायक एस.पी. बालसुब्रमण्यम, संगीतकार, गायक पं. हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गजांनीही केले. त्यामुळे मराठी रसिकांमध्ये, साहित्यात ते कायम जिवंत राहतील. त्यांच्या स्मृती शब्दांच्या, गझलांच्या माध्यमातून नेहमीच मनामनांत दरवळत राहतील. यावेळी गौस शिकलगार यांनी इलाही जमादार यांच्या कबरीजवळ सुचलेली गझल सादर करून रसिकांची मने जिंकली.अभिराज यांनी 'निशिगंध तिच्या नजरेचा', 'शिक एकदा खरेच प्रीत तू करायला', 'लहरत लहरत, बहरत बहरत आली', 'चितेसारखे जाळ मला' या गझलांच्या गीतरचना सादर करून अनोखी आदरांजली वाहिली. इलाही जमादारांच्या शब्दांच्या जादूला रसिकांनी भरभरून दाद दिली.अश्रूंनी वाहिली आदरांजलीइलाही जमादार यांचे बंधू बालेचांद जमादार यांना आदरांजली वाहताना अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या बंधूंवर इतके लोक प्रेम करताहेत, हे पाहून मन भारावून गेल्याचे सांगितले. यावेळी वातावरण भावुक झाले होते.इलाहींचे ग्रंथालयरूप स्मारक व्हावेहर्षित अभिराज म्हणाले की, दुधगाव येथे इलाही जमादार यांचे एक ग्रंथालय स्वरूपात स्मारक व्हायला हवे. ज्याठिकाणी गझलांचा अभ्यास व प्रशिक्षणही असावे. यावर सुरेश पाटील यांनी याकामी सर्व ते सहकार्य आम्ही करू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली