कोकरुड येथे अखंड हरिनाम सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:40+5:302021-09-05T04:30:40+5:30

कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी वाचन आणि वीणा वादन सप्ताह सुरू ...

Uninterrupted Harinam Week at Kokrud | कोकरुड येथे अखंड हरिनाम सप्ताह

कोकरुड येथे अखंड हरिनाम सप्ताह

कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी वाचन आणि वीणा वादन सप्ताह सुरू आहे. सप्ताहाचे हे शंभरावे वर्ष आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे.

श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या सप्ताहाला सुरुवात होते. मंदिरात काकड आरती, कीर्तन, भजन, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी वाचन असे कार्यक्रम होतात. शेवटच्यादिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. व्यासपीठचालक दत्तात्रय शिंदे काम पाहात आहेत. भगवान वकुलकर, दिनकर घोडे, महादेव जडगे, श्रीपती घोडे, सर्जेराव घोडे संयोजन करीत आहेत.

Web Title: Uninterrupted Harinam Week at Kokrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.