नांद्रेत ऊसतोड मुकादमास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:28+5:302021-03-24T04:25:28+5:30
सांगली : द्राक्षे चोरल्याच्या कारणावरून ऊसतोड कामगारांच्या मुकादमास काठीने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. राजाभाऊ निलाप्पा आडे (वय ...

नांद्रेत ऊसतोड मुकादमास मारहाण
सांगली : द्राक्षे चोरल्याच्या कारणावरून ऊसतोड कामगारांच्या मुकादमास काठीने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. राजाभाऊ निलाप्पा आडे (वय ४०, रा. बीड, सध्या रा. नांद्रे, ता. मिरज) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. सुदर्शन अण्णासाहेब पाटील, विपुल पाटील (दोघे रा. शिरगाव, ता. तासगाव) अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांद्रे-शिरगाव रस्त्यावर ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी आडे हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते ऊसतोड मुकादम असून सध्या त्यांचे वास्तव्य नांद्रे येथे आहे. त्यांच्या घराजवळ द्राक्षबागा आहेत. या द्राक्षबागेतील द्राक्षे चोरल्याचा संशय घेऊन संशयितांनी आडे यांना काल सकाळी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर आडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार द्राक्ष बागायतदार सुदर्शन पाटील आणि विपुल पाटील या दोघांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.